आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेकदा महिलांना घर सांभाळताना स्वत:कडे लक्ष द्यायला जमत नाही. अशात त्यांनी जर स्वयंपाक घरात एक छोटा बदल जरी केला तरी ते स्वत:सोबतच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतील. एका तेलाला त्यांनी जर स्वयंपाकघरात जागा दिली तर अनेक आजार त्यांच्यापासून दूर राहतील. आम्ही बोलतोय आलिव्ह ऑईलबद्दल. ऑलिव्ह ऑईलचे 9 फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.
1) ऑलिव्ह आईलमध्ये ओमेगा 6 आणि ओमेगा 3 असल्यानं हृदयासाठी हे टॉनिक आहे.
2) या तेलाच्या जास्त सेवनानं तुमचं वजन कमी होतं. लठ्ठपणावर हा एक चांगला उपाय आहे.
3) या तेलानं ब्लड शुगर कमी होते. टाईप 2 डायबिटीजसाठी हे तेल खूपच लाभदायक आहे.
4) महिलांसाठी याचा विशेष फायदा होतो. गॉल ब्लॅडर स्टोन आणि सूज यावर हे तेल अमृतासमान आहे.
5) या तेलात ओलिक अॅसिड नावाच्या फॅटी अॅसिडचा मोठा साठा असतो. यामुळे महिलांचा कॅन्सरपासून बचाव होतो.
6) यात भरपूर प्रमाणात अॅंटीऑक्टीडेंट गुण असतात. याच्या सेवनानं महिलांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या उशीरा येतात. लवकच म्हातारं होण्यापासून महिलांचा बचाव होतो.
7) या तेलात अँटीइंफ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे कॅन्सरव्यतिरीक्त सोरायसिस, हृदय रोग, डायबिटीज, ऑर्थरायटीस यांसारख्या आजारांवरील आयुर्वेदीक औषधे बनवण्यासाठी याचा उपयोग होतो.
8) या तेलात मोनोसॅच्युरेटेड फॅट असतं. यामुळे अर्धांगवायू आणि मेंदूच्या झटक्याचा खतराही कमी होतो.
9) गॅस्ट्रीक अल्सरमध्ये हे तेल खूप फायदेशीर ठरतं. यामुळे हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाचे बॅक्टेरिया नष्ट होतात.