आरोग्यनामा ऑनलाईन टीम – खोकला हा सामान्य आजार असला तरी तो खुपच त्रासदायक असतो. या आजाराने अनेक लोक सतत त्रस्त असतात. खोकला होण्याची अनेक कारणे असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे संसर्गामुळे ही समस्या होते. धुलीकणांमुळेही खोकल्याचा संसर्ग वाढू शकतो. खोकल्यावर कोणते उपाय करावेत, याची कोणती कारणे असतात, ते आपण जाणून घेवूयात.
हे उपाय करा
1 दिवसातून चार वेळा कोमट पाण्याच्या गुळण्या दररोज कराव्यात. घशाची सूज व कफ कमी होते.
2 गरम दूधात एक चमचा हदळ घालून प्यावी.
3 आल्याचा चहा घ्यावा.
4 तुळशीची पाने आणि आल्याचा काढा करून प्या. खोकल्याचे प्रमाण कमी असल्यास घरगुती उपाय करावेत. खोकल्याबरोबर घसा दुखणे, ताप असेल तर डॉक्टरांकडे जावे.
खोकल्याची 7 कारणे
1 दूषित हवेत श्वसन, 2 धूम्रपान, 3 दमा, 4 ब्रॉँकायटीस, 5 टीबी, 6 फुफ्फुसातील कर्करोग, धुळीचे वाढते प्रमाण, हवामानातील बदल, 7 अॅलर्जी
* खोकला हा रोग नसून, घसा व फुफ्फुसाची बिघडलेली स्थिती सांगणारे लक्षण आहे.