आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हाता-पायाला झालेली छोटी जखम पावसाळा आणि थंडीमध्ये लवकर भरत नाही. यामुळे त्रास वाढत जातो. अशावेळी घरगुती उपाय केल्यास ही जखम लवकर भरून येऊ शकते. यासाठी कडुलिंबाची पाने खुपच गुणकारी आहेत. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुण असतात.
करा हे उपाय
१) कडुलिंबाच्या झाडाची साल पाण्यात उकळा. पाणी कोमट झाल्यावर या पाण्याने जखम स्वच्छ करा. नंतर कडुलिंबाची पाने मधात मिसळून बारीक पेस्ट तयार करून ती जखमेवर लावा. जखम ३ ते ४ तास उघडी ठेवा. जखम लवकर बरी होते.
२) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जखमेवर पट्टी बांधा. जखम अगोदर गरम पाणी आणि कापसाने स्वच्छ करा. नंतर त्यावर पावडर टाका. जखम वाळल्यानंतर औषध लावून पट्टी बांधा.
३) हळदीत पाणी मिसळून ही पेस्ट जखमेवर लावा. एका तासानंतर कोमट पाण्याने धुवा. हळदीचे दूध रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या.