आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सतत एका ठिकाणी बसून पाय सुजतात किंवा सततच्या प्रवासानेही पायाला सूज येते. पाय सुजण्याची इतर अनेक कारणेही आहेत. पण पायाला सतत सूज येत राहिली तर पाय दुखू लागतात. पायांच्या या दुखण्यावर, सुजेवर काही घरगुती उपाय करता येतात.
पायांच्या सुजेवर घरगुती उपाय –
१) रक्त गोठल्यामुळे किंवा त्याचा प्रवाह मंद झाल्यामुळे पाय सुजले असतील तर एरंडेल तेलाने मालीश करावे.
२) लसूण, आलं, कांदा यांचा खाण्यात समावेश करावा.
३) सैंधव मीठाच्या पाण्यात पाय बुडवून ठेवा.
४) पुरेसे पाणी प्या.
५) मीठ अती खाऊ नका.
६) पाय जमिनीपासून वर ठेवण्यासाठी पायाखाली उशा घ्या.
७) खूप अधिक वेळ एकाच स्थितीत बसायचे टाळा.
८) सैल कपडे घाला, घट्ट चपला, बूट, मोजे घालणे टाळावे.
९) एकाच जागी सतत न बसता थोडे आसपास फिरुन शरीराची हालचाल करावी.
१०) जंकफूड, अल्कोहोल, अतिगोड व खारट पदार्थ वर्ज्य करावेत.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)