आरोग्यनामा ऑनलाइन टीम – थायरॉईड हे रोगाचे नाव नसून ती एक ग्रंथी आहे. या ग्रंथीमुळे हा आजार होतो. थायरॉईड ग्रंथी थायरॉक्सिन हार्मोन तयार करुन रक्तात पोहोचवते. यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म नियंत्रित राहते. या ग्रंथी टी-३ म्हणजेच टड्ढाय – आयोडो – थायरोनिन आणि टी-४ म्हणजेच थायरॉक्सिन हे दोन प्रकारचे हार्मोन्स तयार करतात. या दोन्ही हार्मोन्सचे असंतुलन झाल्यास थायरॉईडची समस्या वाढते. हायपोथायरॉईड, हायपरथायरॉईड, थायरॉईड कॅन्सर असे थायरॉयडच्या आजाराचे वेगवेगळे प्रकार आहेत.
ही आहेत लक्षणे
१. थोडे काम केलेतरी उर्जा संपते.
२. डिप्रेशन
३. कामात मन न लागत नाही.
४. स्मरणशक्ती कमी होते.
५. मांसपेशीमध्ये वेदना होतात.
६. रोगप्रतिकार शक्ती कमजोर होते.
७. थकवा जास्त जाणवतो.
८. शरीर सुस्त होते.
अशी घ्या काळजी
१. सेलेनियम असलेले पदार्थ सेवन करा.
२. अंडे, चिकन, पालक खा.
३. चहा, कॉफी बंद करा.
४. तीन किंवा चार तासांनी काहीतरी खा.
५. ओट्स, ज्वारी सेवन करा.
६. आयोडिनयुक्त मिठ आणि मासे खावे.
७. हिरव्या भाज्या, किशमिश, डाळ खा.