आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्या शरीराला व्हिटॅमिन डीची अतिशय गरज असते. म्हणूनच उत्तम आरोग्यासाठी हे व्हिटॅमिन आवश्यक असते. सूर्यप्रकाशातून हे जीवनसत्व आपल्याला भरपूर प्रमाणात मिळू शकते. निसर्गातूनच ते उपलब्ध होत असले तरी सूर्यप्रकाशात कमी जाण्यामुळे याची कमतरता निर्माण होते. यामुळे अनेक रोग शरीरात निर्माण होतात. ड जीवनसत्त्वाच्या अभावामुळे मूत्रपिंडाचे आजार जास्त प्रमाणात होऊ होतात, असे सॅन दिएगो विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात म्हटले आहे.
असे मिळवा ड जीवनसत्व
१. मासे खाल्ल्याने जास्तप्रमाणात प्रकारे ड जीवनसत्त्व मिळते
२. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खा.
३. ऑरेंज ज्यूस प्या.
४. सोया मिल्कचे सेवन करा.
५. चिज नियमितपणे आहारात घ्या.
६. अंड्यातील पिवळा बलक खाल्ल्यानेही ड जीवनसत्त्व मिळते.
७. सूर्यप्रकाश नियमित अंगावर घ्या.