आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ग्रीन टी आरोग्यासाठी अतिशय उपयोगी आहे. फिटनेससाठी अनेकजण नियमित ग्रीन टी पितात. मात्र, ग्रीन टीच्या बॅग्ज वापरल्यानंतर त्या टाकून दिल्या जातात. त्या टाकून न देता त्यांचा पुनर्वापर सौंदर्यवृद्धीसाठी करता येतो. टी बॅग्जचे कोणते फायदे आहेत हे जाणून घेवूयात.
असे वाढवा सौंदर्य
१. टी बॅगचा वापर करून सौंदर्य खुलवू शकता.
२. वापरलेल्या टी बॅग पुन्हा गरम पाण्यात बुडवून त्या पाण्यात काही काळ पाय बुडवून ठेवा. घरच्या घरी फूट स्पा घेऊ शकता. यामुळे पायाची दुर्गंधी कमी होते.
३. शेव्हिंग केल्यानंतर त्वचेची आग होते असल्यास पाण्यात ओली केलेली टी बॅग लावा.
४. केस रुक्ष आणि निस्तेज झाले असल्यास टी बॅग गरम पाण्यात मिसळवून त्या पाण्याने केस धुवावे.