आरोग्यनामा ऑनलाईन- सुकामेवा सर्वांनाच आवडतो. अनेकजण सुकामेवा(dizziness ) खाताना काजू, बदाम, पिस्ता आणि मुनके खाण्यावर जास्त भर देतात. परंतु यातील अक्रोड खायला (dizziness )अनेकांना आवडत नाही. याचे आपल्या शरीराला असंख्य फायदे होतात. आज आपण अक्रोड खाण्याच्या फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.
अक्रोड खाण्याचे फायदे –
1) रक्तदोष, आणि वातरक्त यावर खूप गुणकारी आहे. अनेकांना याबाबत माहिती नाही.
2) याच्या सेवनामुळं वजनही वाढतं.
3) शरीरातील वेगवेगळ्या प्रकारच्या गाठींवर अक्रोड गराचा लेप फायदेशीर आहे.
4) बाळंतणीस दूध कमी येत असेल तर गव्हाच्या चपातीत अक्रोड गर मिसळून पोळी खावी.
5) वारंवार लघवीला येत असेल तर तुप-खडीसाखरेसोबत अक्रोड चूर्ण खावं.
6) कोठा जड असेल किंवा शोचाला नीट होत नसेल तर अक्रोड तेलाचा वापर करावा.
7) चक्कर येणं, गरगरणं, भोवळ येणं या तक्रारींमध्ये अक्रोड खावं. फायदा मिळेल.
8) मासिक पाळीत स्त्राव कमी येणं, साफ न होणं या तक्रारी असणाऱ्या स्त्रियांनी अक्रोड नियमित खावं.
9) पित्ताच त्रास असणाऱ्यांनीही याचं सेवन अवश्य करावं.
10) तुम्ही अक्रोड खात असाल तर यामुळं केसांची चांगली वाढ होते.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.