आरोग्यनामा ऑनलाईन- मधुमेह रूग्णांसाठी ब्रेकफास्ट
मधुमेह हा मेटाबॉलीक असंतुलनमुळे होणारा आजार आहे. रुग्णाच्या शरीरात हार्मोन्सचे उत्पादन आणि वापर कमी होतो. हे हार्मोन मर्यादित प्रमाणात ग्लूकोज आणि साखरेद्वारे आपल्या शरीरात पोहचतात. त्याचबरोबर जर शरीरात इन्सुलिन कमी प्रमाणात तयार होऊ लागले तर मधुमेहाचा धोका वाढतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते मधुमेह असलेल्यांनी त्यांच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. मधुमेह रुग्णांसाठी निरोगी नाश्ता करणे खूप महत्वाचे आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे ५ पदार्थ फायदेशीर ठरू शकतात.
१)ओट्स
ओट्स फायबरचा एक उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो.
फ्लेवर्ड ओट्स खाणे टाळावे कारण त्यातील घटक रक्तातील साखरेवर नकारात्मक परिणाम करतात. बरेच लोक भाज्या घालून ओट्स खातात.
२)उकडलेले अंडी
उकडलेले अंडी देखील संपूर्ण नाश्ता मानला जातो. कमी कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने जास्त असल्याने उकडलेले अंडी निरोगी नाश्त्या आहे. तसेच ते तयार करण्यासाठी तेल वापरावे लागत नाही. यामुळे शरीरात पोषक आणि उर्जेचा अभाव राहत नाही.अंडीही रक्तातील साखर नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे.
३)पालक रस
पालक हा अशा पदार्थांपैकी एक आहे. जो रक्तातील साखरेवर परिणाम न करता संपूर्ण आरोग्यास फायदा करतो. लोह आणि व्हिटॅमिन सी गुणधर्म असलेल्या पालकांचा रस पिल्याने मधुमेह तसेच इतर आजारांपासून बचाव होतो.
४) नट्स आणि बिया
लठ्ठपणा आणि हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना मधुमेहाचा धोका जास्त असतो. नट्स आणि खाद्य बियाणे वजन कमी करण्यास आणि हृदयाचे संतुलन निरोगी ठेवण्यासाठी खाल्ले जाते. त्यामध्ये असलेले प्रथिने बर्याच काळासाठी पोट भरुन ठेवतात ज्यामुळे लोकांना जास्त खाण्याची इच्छा राहत नाही तसेच, रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित राहते.
५)फळ
मधुमेहाच्या रुग्णांना फळांच्या सेवनाबाबत अनेकदा संभ्रम असतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्या फळांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, ते रुग्ण कमी प्रमाणात सेवन करतात. सफरचंद, कीवी आणि स्ट्रॉबेरीचे सेवन रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.