आरोग्यनामा ऑनलाईन- कोरोना(Covid diet) काळात हेल्दी अँड फिट राहाण्यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एक्सपर्टनुसार चांगल्या खाण्यापिण्यामुळे(Covid diet) इम्यूनिटी सिस्टम मजबूत बनवणे, आरोग्य आणि दिर्घजीवन मिळवण्यात मदत मिळते. खाण्यापिण्याची वेळसुद्धा कोटेकोरपणे पाळली पाहिजे. आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यांच्या सेवनाने तुम्हाला अनेक आजारांपासून वाचण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी मदत होईल.
1 बटाट्याचा रस
कच्च्या बटाट्याचा रस प्यायल्याने गॅस, अपचन, पोटाच्या इतर समस्या, कँसर, हायपर टेन्शन, किडनीच्या समस्या, लिव्हरच्या समस्या यामध्ये फायदा होतो. शिवाय इम्यूनिटी वाढते.
2 हळदीचे दूध
हळदीचे दूध प्यायल्याने गाठी कमी होतात, फ्लू, सर्दी, खोकला यात लाभदायक आहे. बौद्धीक काम, स्मरणशक्ती, चांगली झोप यावर देखील गुणकारी आहे.
3 मनुका आणि मध
मनुका आणि मध यांचे आपआपले वेगवेगळे फायदे आहेत, परंतु हे दोन्ही एकत्र सेवन केल्यास याचे फायदे अनेकपटीने वाढतात. याच्यामुळे पचनशक्ती मजबूत होते, पुरूषांची कमजोरी दूर होते. यामध्ये कँसरविरोधी गुणसुद्धा आहेत.
4 गुळ आणि गरम पाणी
आयुर्वेदानुसार, सकाळी उठल्यानंतर गुळ आणि गरम पाणी सेवन केल्यास शरीरात शक्ती येते, रक्त शुद्ध होते आणि नवीन रक्त बनते, हृदयाचे आजार दूर राहतात, थकवा दूर होतो, एनर्जी वाढते आणि शुगरसुद्धा वाढत नाही.
5 लसूण आणि मध
लसूण आणि मध नियमित सेवन केल्यास निद्रानाशाची समस्या दूर होते, एनर्जी वाढते, थकवा दूर होतो.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.