आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सेक्ससंबंधी काही आजार असे आहेत की, शारीरीक संबंधांच्या वेळी कंडोमचा वापर केला तरी हे आजार संक्रमणातून होऊ शकतात. या समस्या कोणत्या आणि त्या टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी जाणून घेवूयात.
१. मोलस्कम
या व्हायरसमुळे त्वचेवर पुळ्या येतात. या पुळ्यांमुळे खूप त्रास होतो. या व्हायरसचे संक्रमण होऊन इतरत्रदेखील ही समस्या होऊ शकते.
२. सिफिलिस
ही समस्या प्रथम सामान्य वाटते, परंतु, नंतर ती गंभीर होऊ शकते. सुरुवातीला त्वचेवर जखमा होतात. काही काळानंतर ह्रदयाशी संबंधीत गंभीर आजार होतात. मेंदूलाही इजा होऊ शकते.
३. नागीण (हर्पिस)
ही समस्या झालेला भाग सेक्स दरम्यान कंडोमने झाकला जात नसेल तर पार्टनरलाही हा आजार होऊ शकतो. ही समस्या पूर्णपणे बरी होईपर्यंत सेक्स करू नये.
४. एचआईवी
एचआईवीव्हायरसचे संक्रमण होण्यासाठी पेनिट्रेशन असणे जरुरी नाही. त्वचेचा त्वचेशी संपर्क आल्यानेही ती होते. या व्हायरसच्या काही स्ट्रेनमुळे सव्र्हायकल कॅन्सर सारखा गंभीर आजारसुद्धा होऊ शकतो.