आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पोटाचा घेर वाढला की व्यक्तीमत्व खराब दिसते. शिवाय, या लठ्ठपणामुळे थायरॉइड, रक्तदाब, मधुमेह आदी आजार सुद्धा होतात. पोटाचा घेर कसा कमी करावा, याविचाराने अनेकजण त्रस्त असतात. यासाठीचे उपाय तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतात. परंतु, अनेकदा पोट कमी करण्याचे अनेक प्रयत्न करूनही यश येत नाही. ही समस्या मोठी असून याची कारणे कोणती हे आपण जाणून घेणार आहोत.
ही आहेत कारणे
१. चुकीचा आहार घेणे
वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य आहार खुप महत्वाचा ठरतो. अनेक लोकांना योग्य आणि अयोग्य आहारातील फरक समजत नाही. तसेच अनेकदा हेच कळत नाही की कोणत्या प्रकारचा आहार आपल्यासाठी योग्य आहे. वाईट कोलेस्टेरॉल वाढविणारे पदार्थ म्हणजे कार्बोहायड्रेट्सचे योग्य प्रमाण आणि स्टार्चयुक्त पदार्थांचे कमी सेवन केल्यासच चरबी कमी होऊ शकते. यासह आहारात हंगामी भाज्या, प्रोटीन्स आणि डेअरी प्रॉडक्ट यांचा समावेश केला पाहिजे.
२. योग्यपद्धतीने व्यायाम न करणे
जिममध्ये जाऊन केवळ घाम गाळल्याने योग्य परिणाम दिसून येत नाही. यासाठी कोणता व्यायाम आणि हा व्यायाम शरीरावर कोणता परिणाम करतो हे महत्वाचे ठरते. पोट कमी करण्यासाठी कोणता व्यायाम करावा यासाठी जिममधील प्रशिक्षकाचा सल्ला घ्या.