आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तोंडातील जिवाणूंमुळे दुर्गधींसह डोकेदुखीचा त्रास सुद्धा होऊ शकतो, असे अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या संशोधनात आढळले आहे. आपण सेवन केलेल्या काही पदार्थामध्ये नायट्रेट असते. जिवाणूंचा या नायट्रेटच्या प्रक्रियेत सहभाग असल्याने नायट्रिक ऑक्सॉइड तयार होते. यामुळे डोकेदुखीची समस्या होते, असे या संशोधकांनी म्हटले आहे.
का दुखते डोके
१) या नायट्रिक ऑक्सॉइडमुळे रक्तवाहिन्या आणि रक्तपुरवठ्यावर प्रभाव पडल्याने डोकेदुखीचा त्रास होतो.
२) हिरव्या भाज्यांमध्ये नायट्रेट असते. यामुळे डोकेदुखी, उलटी होणे, आवाजाचा त्रास होणे अशी लक्षणे सुद्धा संशोधकांना आढळली आहेत.
३) कॅनडात आठ टक्के लोकांमध्ये हा आजार आढळून आला आहे.