आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सिगारेटचे व्यसन आणि प्रदुषण ही फुफ्फुसाच्या कॅन्सरची दोन प्रमुख कारणे असल्याचे मानले जाते. धुम्रपान सोडल्यास 15 वर्षांनीही कॅन्सर होण्याचा धोका असतो. धुम्रपान सोडल्यानंतर कॅन्सरची शक्यता कमी करायची असेल तर आहारात काही खास औषधी वनस्पतींचा समावेश करावा. या वनस्पती कोणत्या ते जाणून घेवूयात.
हे आहे औषध
1 तुळस
अँटीऑक्सिडेंट गुणामुळे तुळस सेवन केल्यास कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो. रोज तुळशीची काही पाने खाल्यास अनेक समस्या दूर होतात. रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
2 लसूण
यातील गुणकारी तत्वांमुळे विविध आजार दूर राहतात. कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात आणि याने फुफ्फुसेही निरोगी राहतात.
3 गुळवेल
गुळवेळमध्ये अँटीबायोटीक आणि अँटी-ऑक्सिडेंट तत्व असल्याने कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामुळे कॅन्सरच्या पेशींसोबत लढण्यास मदत मिळते. या वनस्पतीच्या कंदाचा आणि खोडाचा वापर औषधात केला जातो. या वनस्पतीची पानेही औषधी आहेत. गुळवेलीच्या पानांची भाजी आरोग्यदायी ठरते.
4 ज्येष्ठमध
फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. घशाशी संबंधित समस्या दूर होतात.