आरोग्यनामा ऑनलाइन टीम – खराब जीवनशैली (Bad Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे (Eating Habits) वाढत्या युरिक अॅसिडची समस्या (Uric Acid Problem) तरुण वयातही होऊ लागली आहे. यूरिक अॅसिडचा (Uric Acid) आजार साधारणपणे 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना त्रास देतो, पण चुकीच्या आहारामुळे लोक लहान वयातच या (Uric Acid) आजाराला बळी पडतात.
शरीरातील प्युरिन (Purine) नावाच्या प्रोटीनच्या विघटनाने युरिक अॅसिड तयार होते. प्युरिन हे मानवी शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये आढळणारे ऑर्गेनिक कंपाऊंड (Organic Compound) आहे. 3.5 ते 7.2 मिलीग्राम प्रति डेसीलिटर यूरिक अॅसिड शरीरात असू शकते, ज्यामुळे शरीरात कोणतीही समस्या उद्भवत नाही, परंतु जर यूरिक अॅसिडची पातळी (Uric Acid Level) यापेक्षा जास्त असेल तर शरीरात अनेक समस्या सुरू होतात.
शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्यामुळे सांधे दुखणे (Joint Pain), पायाची बोटे दुखणे (Toe Pain), पायाच्या अंगठ्या वेदना आणि सूज, कोपरे आणि गुडघे दुखणे (Elbows And Knees Pain) अशा तक्रार जाणवतात. यावर त्वरित उपचार न केल्यास हा त्रास आणखी वाढू शकतो.
युरिक अॅसिड (Uric Acid) वाढल्यामुळे, पायांच्या टाचांच्या वेदना खुप त्रासदायक ठरतात. या दुखण्यामुळे पाय जमिनीवर ठेवताच टाच दुखू लागते. जर तुम्हालाही टाचेच्या दुखण्याने त्रास होत असेल तर त्याचे कारणे आणि उपाय जाणून घेवूयात.
यूरिक अॅसिड वाढण्याची कारणे (Causes Of Uric Acid) :
अयोग्य आहार (Improper Diet) हे युरिक अॅसिड वाढण्याचे सर्वात मोठे कारण आहे. अन्नामध्ये रेड मीट (Red Meat), सीफूड (Seafood), डाळ (Dal), राजमा (Rajma), पनीर (Paneer) आणि तांदूळ (Rice) जास्त खाल्ल्याने यूरिक अॅसिडची पातळी वेगाने वाढू लागते. अनेक प्रकरणांमध्ये, ही समस्या अनुवांशिक देखील आहे.
टाच दुखीची कारणे (Causes Of Heel Pain) :
यूरिक अॅसिडच्या पातळीत वाढ झाल्यामुळे टाचेमध्ये वेदना (Heel Pain) होतात.
प्रोटीनयुक्त आहार जास्त घेतल्याने हा त्रास होतो. जास्त प्रोटीन (Protein) सेवन केल्याने आपले लिव्हर ते पचवू शकत नाही,
यामुळे शरीरात यूरिक अॅसिडची पातळी वाढू लागते.
जसजसे यूरिक अॅसिड तयार होते, ते क्रिस्टल्सच्या रूपात सांध्यामध्ये जमा होऊ लागते,
ज्यामुळे गाऊट नावाचा इम्फ्लेमेटरी आर्थराइटिस (Inflammatory Arthritis) होण्याचा धोका वाढतो.
या आजाराने ग्रस्त व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागतो. युरिक अॅसिड वाढल्याने टाचांसोबत इतर सांध्यांवरही परिणाम होतो.
असा करा उपचार (Do This Treatment) :
– यूरिक अॅसिड वाढल्यास प्रथम जीवनशैलीत (Lifestyle) बदल करा, जेणेकरुन हार्मोन बॅलन्स (Hormone Balance) राहील.
– आहारात प्रोटीनयुक्त अन्नाचे सेवन कमी करा.
– पचनाकडे (Digestion) लक्ष द्या, जे अन्न सेवन केल्याने शरीरात रिअॅक्ट होते ते टाळा.
– वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा.
– व्यायाम आणि योगाची (Yoga) मदत घ्या.
– योगासन करा. ते खूप प्रभावी ठरते.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Uric Acid | can uric acid cause heel pain know the causes and treatment
Bhang Hangover | होळीमध्ये पिलेली भांग उतरवण्यासाठी करा ‘हा’ सोपा उपाय, वाचा सविस्तर
Hot Water Bag Side Effects | झोपताना सुद्धा करत असाल गरम पाण्याच्या पिशवीचा वापर, तर व्हा सावध !