आरोग्यनामा ऑनलाइन टीम – छोट्या-छोट्या आजारांचे इन्फेक्शन टाळण्यासाठी घरच्याघरी काही उपाय करणे जास्त परिणाम कारक ठरू शकते. हे इन्फेक्शन परतवून लावण्यासाठी तुमची रोग प्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेचे आहे. यासाठी हर्बल टी, आलं, लिंबू, मध, हळद, लसूण, यांचा वापर करून जीवजंतूंचा संसर्ग टाळता येतो.
हे लक्षात ठेवा
१) साखरेचा वापर कमी करून मधाचा वापर वाढवा. अॅँटीबॅक्टेरिया आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी मध गुणकारी आहे.
२) आहारात लसणाचा वापर वाढवा. यामुळे पचनशक्ती वाढते आणि आजार दूर राहतात.
३) रोज रात्री झोपताना हळदीचे गरम दूध घेतल्याने शक्ती वाढते. घशाचे इन्फेक्शन दूर होते.
४) जिरे आणि मेथी याचा आहारात वापर करा.
५) बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा.
६) चेरी, जांभूळ, लिची, केळी यासारखी फळे खा.
७) भाज्यांचे गरम सूप प्या. यामुळे आजार राहतील. तसच अनेक पौष्टिक मूल्यं मिळतील.
८) हर्बल टी घ्या. त्यात आलं किंवा लिंबू सुद्धा पिळून घेऊ शकता.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)