आरोग्यानामा ऑनलाईन टीम : उसाचा रस आरोग्यदायी असून याच्या सेवनाने शरीराला थंडावा मिळतो, तसेच उर्जाही प्राप्त होते. यातील काही खास गुणधर्मामुळे अनेक आजार दूर राहतात. परंतु, उसाचा रस पिताना काही गोष्टींचा विचार जरूर केला पाहिजे. कारण याच्या सेवनाने काही तोटे सुद्धा होऊ शकतात. हे तोटे कोणते ते जाणून घेवूयात.
हे लक्षात ठेवा
१ दिवसातून केवळ दोन ग्लासच ऊसाचा रस प्यावा, त्यापेक्षा अधिक घेतल्यास नुकसान होऊ शकते. काविळीत जास्त रस घेऊ शकता.
२ फ्रिज केलेला उसाचा रस आरोग्यास हानिकारक ठरू शकतो.
३ यात इतर कोणताही रस मिसळू नये. पाणी टाकू नये. बर्फही कमीच वापरावा.
४ वजन कमी करणारांनी उसाचा रस पिऊ नये.
५ मधुमेह असलेल्यांनी उसाचा रस घेऊ नये.
६ रक्तातील साखर अचानक वाढत असल्यास हा रस घेऊ नये. यामुळे ब्लड इन्फेक्शन होऊ शकते.
७ यामुळे कफाचा त्रास वाढतो.
Visit : arogyanama.com