• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

महिलांनो ‘या’ समस्या आढळल्यास दुर्लक्ष करू नका

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 2, 2019
in फिटनेस गुरु, माझं आराेग्य
0
ladies-helth

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – महिला आपल्या आरोग्याची काळजी व्यवस्थित घेत नसल्याने महिलांनमध्ये जास्त आरोग्याच्या समस्या दिसून येतात. संपूर्ण घराजी काळजी घेता घेता महिला स्व:ताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. याच समस्या नंतर अधिक गंभीर होतात. त्यामुळेच वेळीच अशा समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे. काही आजारांचे संकेत शरीर देत असते. हे संकेत, लक्षणे ओळखून महिलांनी तातडीने डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे. तसेच स्वतःची काळजी घेतली पाहिजे.महिलांना शरीरात काही जाणवत असतील, तर त्याचे कारण जाणून घ्यायला हवे. काही लक्षणे अशी असतात ज्यांचे रूपांतर नंतर मोठ्या आजारात होऊ शकते. ही लक्षणे कोणती याविषयी माहिती घेवूयात.

पहिले लक्षण आहे, पाठिच्या खालच्या भागामध्ये आणि पायांमध्ये वेदना होणे. मासिक पाळीदरम्यान पाठिच्या खालच्या भागामध्ये आणि पायांमध्ये वेदना होणे सामान्य असू शकते. परंतु त्याआधी किंवा त्यानंतरही असे होणे सामान्य नाही. त्यामुळे असा त्रास होत असल्यास एंडोमेट्रियोसिसचा धोका होऊ शकतो. यामुळे दुर्लक्ष न करता सरळ डॉक्टरांची भेट घ्या.

दुसरे लक्षण आहे मासिक पाळी दरम्यान लाल किंवा ब्राउन रंगाचे गोठलेले रक्त येणे. मासिक पाळीदरम्यान प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लीडिंगचा सामना करावा लागतो. कमी, जास्त प्रमाणात हे ब्लीडिंग होते. तसेच हलक्या लाल रंगाचं अथवा गडद लाल रंगाचं ब्लीडिंग होते. पण मासिक पाळी दरम्यान जर गोठलेले रक्त येत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नये. हे संकेत यूटड्ढसमध्ये फायब्रॉएड आहे. हा गर्भाशयामध्ये होणारा एक ट्यूमर आहे. ज्याचा आकार हळूहळू वाढतो यामुळे अनियमित मासिक पाळी आणि ब्लीडिंगशिवाय वंधत्वाचा धोकाही वाढतो.

तिसरे लक्षण आहे जास्त गरम होणे किंवा थंडी वाजणे होय. जास्त गरम होत असेल किंवा थंडी वाजण्याचे कारण एस्ट्रोजनची पातळी असू शकते. हे एक प्रकारचे हार्मोन असते. एस्ट्रोजन हार्मोनची भूमिका महिलांमध्ये अधिक असते. तसेच केस गळणे हेदेखील दखल घेण्याजोगे लक्षण आहे. अनेकदा केस गळण्याच्या समस्येकडे महिला दुर्लक्ष करतात. केस जास्त गळत असतील तर ते आरोग्यासाठी घातक ठरते. कारण केस निरोगी ठेवण्यासाठी टेस्टोस्टेरोन महिलांच्या ओवरीमध्ये फार कमी प्रमाणात असते. या व्यतिरिक्त हे असंतुलित झाल्यामुळे वजन वाढते, चेहरा आणि इतर अवयवांवर केस येणे यांसारख्या समस्या वाढतात. पोट फुगणे हे लक्षण देखील गंभीर आहे.

अनेक महिलांना मासिक पाळीदरम्यान पोट फुगण्याच्या समस्येचा त्रास होतो. ही समस्या दर आठवड्याला होत असेल तर हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असते. कारण हे एंडोमेट्रियोसिस असू शकते. यामध्ये पोट फुगल्यासारखं वाटतं आणि एंडोमेट्रियोसिस ऊतक तुटून जातात. याचा परिणाम प्रजनन क्षमतेवरही होतो आणि गरभधारणेमध्येही समस्या उद्भवतात. याव्यतिरिक्त सतत सूज येणं, पोटाचा ट्यूमर, हर्निया, लिव्हर इन्फेक्शन, ओव्हरियन कॅन्सर किंवा यूट्रस कॅन्सरही होऊ शकतो. त्यामुळे यापैकी कोणतीही लक्षणे आढल्यास दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांना भेटा.

Tags: arogyanamaBodydiabetesdietdiseasedoctorexerciseFoodhealthHospitalMedicineMenstrual periodSkinweightWomenआजारआरोग्यआरोग्यनामाआहारउपायऔषधकॅन्सरडॉक्टरमासिक पाळीरुग्णालयवजनव्यायामशरीर
High Blood Sugar | diabetes high blood sugar warning signs symptoms of blood sugar is too high fatigue weight loss
ताज्या घडामाेडी

High Blood Sugar | ‘ही’ 5 लक्षणे दिसताच समजून जा की खुप वाढली आहे ब्लड शुगर, ताबडतोब लक्ष द्या

by Nagesh Suryawanshi
June 23, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - हाय ब्लड शुगरला (High Blood Sugar) हायपरग्लाइसेमिया देखील म्हणतात. ज्या लोकांना मधुमेह (Diabetes) आहे, अशा लोकांमध्ये...

Read more
Natural Teeth Whiteners Fruits | these foods fruit are natural teeth whiteners home remedies

Natural Teeth Whiteners Fruits | पाच पदार्थ आणि फळं, ज्याच्या सेवनाने तुमचे दात चमकतात

June 23, 2022
Sole Pain | pain in soles follow these home remedies

Sole Pain | टाचेमध्ये सुया टोचण्यासारखे वाटते का? काळजी करू नका, ‘या’ उपायांचा अवलंब करा

June 23, 2022
Sesame Oil Benefits | sesame oil helps in increasing immunity know its benefits

Sesame Oil Benefits | तिळाच्या तेलामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, जाणून घ्या त्याचे इतर फायदे

June 23, 2022
Diabetes Tips | according to american nutritionist 10 minute walking after meal is best way to control blood sugar

Diabetes Tips | पाकातील गुलाबजाम खा किंवा जिलेबी, खाल्ल्यानंतर केवळ करा हे सोपे काम, कधीही वाढणार नाही Blood Sugar

June 23, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021