आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Heart Health Tips | खुप जास्त थंडी असताना शरीरातील रक्त घट्ट झाल्याने रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. या कारणास्तव हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका या काळात अनेक पटींनी वाढतो. यासाठी हिवाळ्यात हृदयाची काळजी घेतली पाहिजे. लहान मुले, वृद्ध आणि उच्च रक्तदाब व हृदयरोगाच्या रुग्णांसाठी थंड हवामान घातक ठरते. हिवाळ्यात घाम न आल्याने शरीरातील मीठाचे प्रमाण वाढते आणि रक्तदाब वाढतो. यामुळे अशा व्यक्तींना खुप काळजी घ्यावी लागते. (Heart Health Tips)
अशी घ्या काळजी
1) उच्च रक्तदाब व हृदयाच्य समस्या असलेल्या व्यक्तींनी या काळात सात ते आठ तास झोप घ्यावी. शरीर कपडे परिधान करावेत. कान झाकून घ्यावेत.
2) हृदयरोग असलेल्यांनी थंडीत तेलकट खाद्यपदार्थ खावू नये. थंडीत शारीरिक हालचाल कमी झाल्याने रक्तदाब वाढून हार्ट अटॅकची शक्यता असते. याकाळात धमन्या आकुंचन पावल्याने रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात.
3) हृदयरुग्ण व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी सकाळी फिरणे टाळावे. त्याऐवजी संध्याकाळी फिरावे किंवा व्यायाम करावा.
Diet Tips | दररोज ‘या’ 7 गोष्टींचं करा सेवन ! थकवा, अशक्तपणा आणि प्रोटीनची कमी करा दूर, जाणून घ्या
Unwanted Pregnancy | गर्भनिरोधक गोळी घेण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या