आरोग्यनामा ऑनलाईन- मुलांना नेहमीच गोड पदार्थांमध्ये ( right age )चॉकलेट पसंत असते. परंतु, मुलांसाठी चॉकलेटची जास्त मात्रा नुकसानकारक ठरू शकते. कारण चॉकलेटमध्ये कॅफीन असते. हे मुलांच्या प्रकृतीवर वाईट ( right age )परिणाम करू शकते. जास्त चॉकलेट खाल्ल्याने ब्लड प्रेशर आणि हृदयाची धडधड वाढू शकते.
याशिवाय चॉकलेटमध्ये इतरही काही तत्व असतात जी मुलांच्या प्रकृतीसाठी हानिकारक आहेत. चॉकलेटमधील थियोब्रोमाइन आणि फेनाइलेथॅलामाइन मुलांच्या नर्वस सिस्टमचे नुकसान करू शकते. तर, एन्डामाइड अॅसिडमुळे मेंदूची कार्यप्रणाली प्रभावित होऊ शकते.
मुल एक वर्षाचे होईपर्यंत चॉकलेट देऊ नका
मुल एक वर्षाचे झाल्यानंतरच त्यास डार्क चॉकलेट खाऊ घालण्यास सुरूवात करा. मुलांना चॉकलेटची कोणत्याही प्रकारची अॅलर्जी तर होत नाही ना, याकडे लक्ष द्या.
हे आहेत चॉकलेटचे फायदे
1 स्मरणशक्ती वाढते
चॉकलेटमध्ये फ्लेवोनोल्स असते, हे मुलांच्या मेंदूच्या विकासात सहायक ठरते. यामुळे स्मरणशक्ती वाढते.
2 सेल रिपेयरिंग
चॉकलेटमध्ये भरपूर अँटीऑक्सीडेंट असते. यामुळे पेशींची दुरूस्ती होते.
3 ब्लड सर्क्युलेशन
चॉकलेटमधील फ्लेवेनॉल्स रक्ताची गुठळ्या होऊ देत नाही. ब्लेड सक्युलेशनमध्ये सुधारणा होते. हृदयाचे कार्य सुधारते.
4 बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते
मुलांमध्ये कोलेस्ट्रॉलची चिंता नसते. पण मोठ्यांमध्ये चॉकलेट बॅड कोलेस्ट्रॉल एलडीएल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.
5 मूड चांगला होतो
चॉकलेटमध्ये आढळणारे एंडोर्फिन व्यक्तीमध्ये आनंदाची भावना निर्माण करते आणि मूड चांगला होतो.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.