आरोग्यानामा ऑनलाईन टीम : वजन वाढण्याची अनेक कारणे सांगितली जातात. परंतु, चीन आणि ब्रिटीश अभ्यासकांनी केलेल्या संशोधनानुसार वजन वाढण्याचे मुख्य कारण डाएटमधील फॅट्स हे आहे. वजन वाढण्याचे कारण डाएटमध्ये असलेल्या प्रोटीन आणि सुक्रोज नाही तर डाएटमधील फॅट आहे. वजन वाढण्यासाठी कोणते न्यूटरिएंट सर्वात जास्त कारणीभूत आहे, ते जाणून घेवूयात.
हे आहे कारण
डाएटमध्ये फॅट जास्त प्रमाणात असल्याने मेंदूतील डोपामाइन आणि सेरोटोनिन हार्मोन्स निघतात. ज्यामुळे जास्त खाण्याची इच्छा होते. प्रमाणापेक्षा जास्त खाणे होते. जर डाएटमध्ये फॅटचे प्रमाण कमी असेल तर जेवण कमी जाते.
लक्षात ठेवा
१ डाएटमध्ये प्रोटीन आणि कार्बोहायडेटचे प्रमाण संतुलित असेल तर वजन वाढत नाही.
२ जर वजन वाढू द्यायचं नसेल तर डाएटमध्ये फॅटचा वापर कमी करा.
३ वजन वाढण्याच्या भीतीने डाएटमधून फॅट पूर्णपणे दूर करू नका.
४ फॅट असलेले पदार्थ कमी प्रमाणात खावेत.
५ शरीराचे मेटाबॉलिज्म योग्यप्रकारे चालण्यासाठी फॅटचीही गरज असते.
Visit : arogyanama.com