आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पुरूषांनी आपल्या आहारात या दूधाचा समावेश केल्यास अनेक आजार त्यांच्यापासून चार हात दूर राहू शकतात. अमेरिक, जपान या देशातील पुरूष या दुधाचा मोठ्याप्रमाणात वापर करतात. यातील पोषकतत्वांमुळे अनेक आरोग्य समस्यांमध्ये फायदा होतो. हे दूध कोणते ते जाणून घेवूयात.
१. सोया मिल्कमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्व असल्याने मांसपेशी मजबूत होतात. स्किन सेल्सचे टिशूज मजबूत होऊन केस गळती थांबते.
२. यात ओलेइक अॅसिड असते, ज्यामुळे रंग गोरा होण्यास मदत होते आणि आपण स्मार्ट दिसतो.
३. कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. यामुळे ह्रदय निरोगी राहते.
४. यातील फायटोकेमिकल्समुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार दूर राहू शकतो.
५. यामध्ये मॅग्नेशियम भरपूर असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
६. यातील कॅल्शिअममुळे सांधेदुखी दूर होते.
७. यातील कार्बोहायड्रेट्समुळे थकवा जाणवत नाही, क्षमता वाढते.
८. यात सॅचुरेटेड फॅट कमी असल्याने वजन कमी होते.