आरोग्यनामा ऑनलाईन टीम – युनिकोंडायलर अर्थात पार्शल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करून संधिवात झालेल्या गुडघ्याचा केवळ खराब कप्पा बदलता येतो. यामुळे रुग्णांना अधिक नैसर्गिकरीत्या हालचाल करणे शक्य होते. गुडघ्याच्या आजूबाजूचे स्नायू व लिगामेंटसना धक्का न लावता ही शस्त्रक्रिया करता येते. या शस्त्रक्रियेनंतर व्यायाम करणे, सायकल चालवणे, ट्रेकिंग, पोहणे अशा हालचालीही करणे शक्य असते.
युनिकोंडायलरची माहिती
1 वय वाढल्यामुळे संधीवाताने गुडघेदुखी जडलेल्या व्यक्तीस संपूर्ण गुडघा बदलण्याची गरज नसते. बहुसंख्य रुग्णांच्या गुडघ्यातील केवळ एकच कप्पा खराब झालेला असतो. तो युनिकोंडायलर शस्त्रक्रियेने बदलता येतो.
2 या शस्त्रक्रियेनंतर एक दिवसाने रुग्ण घरीही जाऊ शकतो.
3 एका दिवसात पार्शल आणि टोटल नी रिप्लेसमेंटची तुलना करता पार्शल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेसाठी जवळपास 25 ते 30 टक्क्यांनी कमी खर्च येतो.
4 युनिकोंडायलर शस्त्रक्रियेद्वारे गुडघ्याचा बदललेला सांधा जवळपास 20 वर्षे टिकू शकतो.