आरोग्यानामा ऑनलाइन टीम : सर्वांनी एकत्र जेवण करावे, असे आपल्याकडे नेहमी सांगितले जाते. शिवा, एकट्याने जेवण करणे चांगले समजले जात नाही. जुन्या रिसर्चनुसार एकटे जेवल्याने माणसाला डिप्रेशन आणि तणावाचा सामना करावा लागतो. मात्र, सध्याच्या एका शोधानुसार एकत्र बसून जेवल्याने जास्त जेवण केले जाते. तसेच यामुळे कधी न खाल्लेले पदार्थही सेवन केले जातात. नवीन अभ्यासानुसार एकत्र जेवणाने कोणते परिणाम होतात, ते जाणून घेवूयात.
हे आहेत परिणाम
१ मासनिक आरोग्याचे तज्ञ जॉन दी कास्त्रो यांनी १९९४ मध्ये ५०० लोकांवर केलेल्या संशोधनानुसार एकत्र जेवणारे लोक जास्त जेवण करतात.
२ अन्य एका संशोधनानुसार गटाने जेवण करणारे लोक हे ४० टक्के जास्त आइस्क्रीम किंवा इतर पदार्थ खातात.
३ कास्त्रो यांच्यानुसार एकत्र जेवण करणारे जास्त खात नाहीत.
४ काही रिसर्च असं सांगतात की, एकत्र जेवताना सर्वजण इतरांचा विचार करतात, म्हणून जेवण कमी केले जाऊ शकते.
Visit : arogyanama.com