आरोग्यानामा ऑनलाइन टीम : वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध प्रकारचे डाएट फॉलो करतात. मात्र, कधी-कधी या डाएटमुळेही शरीरावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे वजन कमी करताना नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घेणे उचित ठरते. तसेच काही सोपे गोष्टींचे पालन केले तरी वजन लवकर कमी होऊ शकते. यासाठी आहारासंबंधीच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. आहार शिजवण्याची पद्धतसुद्धा वजन कमी करण्यास उपयोगी पडते. अशा चार पद्धती आपण जाणून घेणार आहोत.
असे शिजवा जेवण
१ वाफेवर तयार करा
पदार्थ वाफेवर शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे सुरक्षित राहतात. तेल टाकण्याचीही गरज नसते. वजन कमी करण्यास मदत होईल.
२ अन्न शिजवणे
अन्न शिजवताना त्यातील १० ते १५ टक्के पोषक तत्वे नष्ट होतात. पण काही पदार्थ शिजवून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
हे लक्षात ठेवा
* आपण अन्न कसे शिजवतो हे महत्वाचे आहे. खाद्य पदार्थ दोन प्रकारे खाल्ले जातात. एक म्हणजे कच्चे आणि दुसरा म्हणजे शिजवून. यापैकी योग्य पद्धतीचा अवलंब करा.
* वाफेवर भाज्या-पदार्थ शिजवल्यास त्यातील पोषक तत्वे कायम राहतात. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.
Visit : arogyanama.com