आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बॅक्टेरिया अथवा यीस्टमुळे नाभीमध्ये संसर्ग होतो. कोणत्याही वयात होत असलेल्या या संसर्गामुळे नाभीमध्ये सूज, लालसरपणा, वेदना, हिरव्या किंवा राखाडी प्रदरासारखी समस्या होते. घरागुती उपाय केल्यास नाभीचा हा संसर्ग टाळणे सहज शक्य आहे. नाभीच्या संसर्गापासून बचाव करणारे घरगुती जाणून घेवूयात.
हे उपाय करा
लवंग तेल
अर्धा चमचा लवंग तेल कापसाच्या मदतीने नाभीवर लावा. १५ मिनिटानंतर स्वच्छ करुन घ्या.
कडूलिंबाचे पान
कडूलिंबाच्या ५-८ पानांची पेस्ट बनवून यामध्ये चिमूटभर हळद मिसळून नाभीवर लावा. १५ मिनिटांनंतर धुवून घ्या.
ऑलिव्ह ऑइल
एक चमचा ऑलिव्ह ऑइल आणि एक खोबरेल तेल एकत्र करू यात टी ट्री ऑइलचे ३-४ थेंब मिसळून कापसाकच्या मदतीने नाभीवर लावा.
लसणाचे तेल
अर्धा चमचा लसणाचे तेल कापसाच्या मदतीने नाभीवर लावा. १५ मिनिटांनंतर स्वच्छ करा.
व्हिनेगर
एक-एक चमचा व्हिनेगर आणि कोमट पाणी मिसळा. हे कापसाच्या मदतीने नाभीवर लावा. २० मिनिटांनंतर स्वच्छ करा.
एलोवेरा जेल
आठवड्यातून २-३ वेळा एलोवेरा जेल नाभीवर लावा.
हळद
अर्धा चमचा हळद आणि अर्धा पाणी एकत्र करुन पेस्ट बनवा. हे नाभीवर १५ मिनिटे लावून ठेवा.
मीठ
एक वाटी कोमट पाण्यात एक चमचा मीठ मिसळून कापसाच्या मदतीने नाभी स्वच्छ करा.