आरोग्यनामा ऑनलाईन टीम – योग्य वेळी योग्य पदार्थ खाल्ल्याने तुम्ही फिट आणि हेल्थी राहू शकता. अनेकांना सकाळी खाण्याची सवय असते. मात्र सकाळी रिकाम्या पोटी किंवा काही पेय पिणे हे शरीराला हानिकारक ठरू शकतात. नेमके कुठले पदार्थ शरीरासाठी हानिकारक आहेत जाणून घ्या –
1) कोल्डड्रिंक
कोल्डड्रिंक कधीही रिकाम्या पोटी घेऊ नये. यात मोठ्या प्रमाणात कार्बोनेट अॅसिड असते. यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका निर्माण होतो. तसेच पोटाच्या समस्याही वाढतात.
रिकाम्या पोटी कोल्डड्रिंक सेवन केले तर पोटातील सूक्ष्म रक्तवाहिन्या पोटातील सगळ्या भागाला रक्तपुरवठा करू शकत नाहीत, रक्तपुरवठा कमी झाला तर पचनशक्ती मंदावते.
2) मिठाई
रिकाम्या पोटी, सकाळी सकाळी पोटात काहीही नसताना कोणतेही साखरेचे पदार्थ खाणे आपल्या शरीराला अपायकारक असतात.
कारण रिकाम्या पोटी साखरेचे पदार्थ खाण्याने पोटात इन्शुलिन तयार होण्याचे प्रमाण कमी कमी होत जाते त्यामुळे रक्तातील साखर वाढते , डायबेटीस होतो.
3) लोणचे
लोणच्यांमध्ये मसाला आणि मीठ मोठ्या प्रमाणात असते. हे शरीरातील ऍसिडिटी वाढवतात. त्यामुळे अल्सर, मूळव्याधी सारख्या आजार होतो. शिवाय ब्लड प्रेशरही वाढण्याचा धोका निर्माण होतो.