आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सतत एनर्जी ड्रिंक्स घेणे आरोग्यासाठी लाभदायक नसून उलट हानिकारक ठरू शकते. कारण यामुळे मेंदूच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तसेच रक्तदाब सुद्धा वाढू शकतो. झटपट एनर्जी मिळवण्यासाठी याचे सतत सेवन केल्यास अनेक तोटे होऊ शकतात. एका प्रसिद्ध आरोग्य मासिकात यासंदर्भातील संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
हे लक्षात ठेवा
१. ही सवय आटोक्यात आणावी, शक्य झाले तर लवकरात लवकर सोडा.
२. एनर्जी लॉस भरून काढायचाच असेल तर त्यासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करा.
३. अल्कोहोलमध्ये एनर्जी ड्रिंक मिसळून पिणे अत्यंत धोकादायक आहे.