आरोग्यनामा ऑनलाईन- अंडी शरीरासाठी खूप फायदेशीर असतात, म्हणून त्यांना सुपरफूड देखील म्हणतात. आपण त्यास उकडून, शिजवून, फ्राय किंवा करी बनवून खाऊ शकता. झटपट बनत असल्यामुळे देखील बर्याच लोकांना अंडी आवडतात. प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि हेल्दी फॅट यासारखी बरीच पोषक तत्त्वे अंड्यांमध्ये आढळतात, परंतु हे लक्षात घ्यावे की जास्त अंडी खाणे देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
एका अभ्यासामध्ये असा खुलासा झाला आहे की जास्त अंडी खाणाऱ्यांना डायबिटीजचा(Diabetes ) धोका उद्भवू शकतो. चायना मेडिकल युनिव्हर्सिटी आणि कतार युनिव्हर्सिटीच्या एका नव्या स्टडीमध्ये असे आढळले आहे की दररोज एकापेक्षा जास्त अंडी खाल्ल्यास डायबिटीजचा(Diabetes ) धोका 60 टक्क्यांनी वाढू शकतो. हा अभ्यास ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झाला आहे.
अभ्यासामध्ये असे आढळले आहे की वर्षानुवर्षे दररोज अंडी खाण्याच्या सवयीमुळे लोकांच्या शरीरात प्रति ग्रॅम अंड्यांची संख्या वाढत गेली. अभ्यासात आढळून आले की दररोज 38 ग्रॅम अंडी खाल्ल्याने डायबिटीजचा धोका जवळपास 25 टक्क्यांनी वाढला आणि दररोज 50 ग्रॅमपेक्षा जास्त अंडी खाल्ल्याने हा धोका 60 टक्क्यांपर्यंत वाढला.
अंडी आणि डायबिटीज यांच्यातील संबंधांबद्दल बर्याचदा वादविवाद होत राहतात. डॉक्टर म्हणतात की खाण्याच्या सवयी आणि टाइप -2 डायबिटीजमध्ये गहन संबंध आहे. योग्य आहार घेतल्याने डायबिटीजला नियंत्रित करता येऊ शकते. डायबिटीजची प्रकरणे जगभरात सातत्याने वाढतच आहेत. डब्ल्यूएचओ (WHO) च्या आकडेवारीनुसार जगभरातील जवळजवळ 6 टक्के लोक खराब जीवनशैलीमुळे या आजाराने ग्रस्त आहेत आणि त्याची संख्या सातत्याने वाढत आहे. डायबिटीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य आहारासह योग्य जीवनशैली देखील महत्त्वपूर्ण आहे.
डायबिटीजचा धोका टाळण्यासाठी आपण हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केले पाहिजे. पालक, कारले, ब्रोकोली, गाजर, मेथी, कोबी, टोमॅटो, शतावरी, काकडी, हिरव्या शेंगा आणि बथुआ अशा भाज्यांचे सेवन करावे. या सर्व भाज्या डायबिटीजमध्ये खूप फायदेशीर आहेत. यांमध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट तुमचे हृदय आणि डोळे निरोगी ठेवतात.
रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास जास्त स्टार्च असलेल्या भाज्या खाऊ नयेत. डायबिटीजची समस्या उद्भवल्यास बटाटा, फुलकोबी, मका, वालाच्या शेंगा, मटर, चणा, मसूर डाळ, भोपळा, सलगम आणि रताळे यासारख्या गोष्टी खाणे टाळावे.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.