आरोग्यानामा ऑनलाइन टीम : अतिराग येणे हा स्वभावाचा प्रकार आहे, असे समजून दुर्लक्ष करू नका. कारण, या स्वभावामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. माझा स्वभाव रागिष्ट आहे, असे समजून मिरवू नका, त्यामुळे काय होऊ शकते, हे जाणून घ्या.
हे आहेत धोके
१ हार्ट अटॅक
सतत चिडचिड, राग, संताप, अन्झायटी, स्ट्रेस आणि अॅसिडीटी यांचा एकत्रित परिणाम होऊन हार्ट अटॅकसुद्धा येऊ शकतो.
२ डिप्रेशन
सतत चिडचिड हे डिप्रेशनचे लक्षण असू शकते.
३ वजन वाढ
कधीकधी सतत राग येत असल्यास खाण्यावर नियंत्रण राहत नाही. तसेच जास्त रागिष्ट लोकांनी आहार कमी घेतला तरी वजन चटकन कमी होत नाही, असे तज्ज्ञ सांगतात.
४ भांडण करणे
सतत इतरांशी भांडल्यानं मानसिक स्वास्थ्य बिघडते. शिवाय, सामाजिक प्रतिमा बिघडू शकते.
५ कमी आत्मविश्वास
राग येत असलेल्या व्यक्तींचा आत्मविश्वास कमी असू शकतो. लोक कमी लेखतात असा समज झाल्याने राग येऊ शकतो.
६ फुफ्सुसांची समस्या
सतत मूड बदलल्याने श्वसनावर परिणाम होतो. यामुळे फुफ्फुस आणि फुप्फुसाच्या क्षमतेवर परिणाम होतो.
७ अकाली वृद्धत्व
जास्त राग येत असल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, अॅसिडीटी वाढणे, वृद्धत्वाची लक्षणे दिसून येणे, अशी समस्या होऊ शकते.
८ अटेन्शन स्पॅन
जास्त राग येत असलेल्या व्यक्तींचा अटेन्शन स्पॅन कमी होतो. लक्ष एकाग्र करण्यात अडचण येते.
९ झोपेची समस्या
राग, चिडचिड याचा परिणाम झोपेवर होतो. झोप कमी लागते.
१० रोग प्रतिकारशक्ती
सतत चिडल्याने खाण्यापिण्यावर परिणाम होऊन रोग प्रतिकार शक्ती कमी होऊ शकते.
Visit : arogyanama.com