आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हळद आणि मध एकत्र करून वापरल्यास सौंदर्य अधिक खुलू शकते. हळ्दीमध्ये मध मिसळल्याने त्वचेचा ओलावा टिकून राहतो. यामुळे त्वचा तजेलदार होते. हळदीतील करक्यूमिन सारखे अँटीऑक्सीडेंट्स असल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात. यामधील अँटीसेप्टिक गुणधर्म सौंदर्य वाढवतात. हळद आणि मधाचा वापर सौंदर्य वाढविण्यासाठी कसा करावा, याविषयी जाणून घेवूयात.
अशी आहे पद्धत
१) एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा मध मिसळून घ्या.
२) हे पाणी आइस ट्रेमध्ये टाकून फ्रीजरमध्ये दोन ठेवा. याचे आइस क्यूब तयार झाल्यानंतर हे क्यूब्स हकल्या हातांनी चेहऱ्यावर दोन मिनिटे रफ करा.
होतील हे फायदे
* स्किन टाइट होते. रिंकल्स ठिक होतील.
* पिंपल्स ठिक होतात. डाग दूर होतात.
* सुरकूत्या ठिक होतात.
* ग्लो वाढतो. स्किन सॉफ्ट होते.
* त्वचेच्या डेड सेल्स निघून जातात. रंग गोरा होतो.