आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बॅलन्स डायट घेण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ नेहमीच देतात. मात्र, अनेक लोकांना याचा अर्थ माहित नसल्याने चुकीचा आहार घेतला जातो. तज्ज्ञांकडून याबाबत सविस्तर माहिती घेतल्यास योग्य आहार घेतला जाऊन शरीर निरोगी राहू शकते. यासाठी डायटसंबंधीत अशीच माहिती आपण जाणून घेणार आहोत.
बॅलन्स डायट
जेवणामध्ये व्हिटॅमिन्स, प्रोटीन, कार्ब, फायबर संतुलित प्रमाणात असते त्याला बॅलन्स डायट म्हणतात. जेवणात दूध, हिरव्या भाज्या, ताज्या फळांचा समावेश करावा. फास्ट फूड, थंडपेय यापासून दूर राहावे.
प्रोटीन शरीरासाठी आवश्यक
शरीराला ऊर्जावान ठेवण्यासाठी प्रोटीन महत्वाचे असते. यासाठी अंकुरित धान्य सेवन करावीत. यामध्ये प्रोटीनसोबतच कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन आणि खनिज असतात. हे पचनासाठी आवश्यक असते. यामुळे शरीरात ऊर्जेचा स्तर कायम राहतो. दिवसभरात ८ ते १२ ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण संतुलित राहते.
ही काळजी घ्या
फास्ट फूडमध्ये सॅच्यूरेटेड फॅट, ट्रान्स फॅट आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असते. हे निरोगी आहाराच्या श्रेणीत बसत नाही. हाडे मजबूत ठेवण्यासाठी अल्कोहलपासून दूर राहावे. शरीराला जर पुरेसे कॅल्शियम मिळाले नाही तर ते हाडांमधून कॅल्शियम घेण्यास सुरुवात करते. यामुळे हाडे बारीक होतात.