आरोग्यनामा ऑनलाईन- कोरोना संकटात हेल्दी आणि फिट राहणे जरूरी आहे. हा आजार कमजोर लोकांना लवकर टार्गेट करत आहे. हेल्दी राहण्यासाठी चांगले खाणेपिणे आणि चांगली झोप जरूरी आहे. झोप पूर्ण झाली नाही तरी इम्यून सिस्टम कमजोर होऊ शकते. आपण काही अशा वस्तूंबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांचे सेवन रात्री टाळले(Avoid ) पाहिजे, जर चांगली झोप हवी असेल.
या वस्त रात्री खाणे टाळा(Avoid )
1 क्रूसीफेरस व्हेजिटेबल
ब्रोकली, फ्लॉवर, आणि कोबीसारख्या भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते, जे आरोग्यासाठी जरूरी आहे. परंतु रात्री झोपताना पचनक्रियेसाठी पचवण्यासाठी खुप मेहनत करावी लागते. यामुळे झोप प्रभावित होते.
2 गोड पदार्थ किंवा आईस्क्रीम
गोड पदार्थ आणि आईस्क्रीम पचन होण्यास बराच वेळ लागतो. शिवाय शरीरात एनर्जी वाढत यामुळे झेप लवकर लागत नाही.
3 दारू
दारू प्यायल्याने चांगली झोप मिळत नाही, सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो. शिवाय इतरही आजार होतात.
4 चहा किंवा कॉफी
चहा, कॉफी किंवा चॉकलेट यामध्ये कॅफीन जास्त असल्यान झोप कमी मिळू शकते.
5 टोमॅटो, आंबट फळे
टोमॅटोमध्ये टायरामाइन नावाचे अमीनो अॅसिड असल्याने लवकर झोप येत नाही. तर आंबट फळे लवकर डायजेस्ट होत नाहीत, याचा झोपेवर परिणाम होतो.
6 संत्र्याचा ज्यूस
या ज्यूसचे रात्री लवकर पचन होत नाही आणि शरीरात अॅसिड तयार होते.
7 फास्ट फूड
बर्गर असे फास्ट फूड आहे, जे रात्री खाल्ल्याने थेट पचनशक्तीवर अटॅक करते. हे रात्री पचवणे अवघड असते. यामुळे पोट खराब होऊन झोपेवर परिणाम होतो.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.