आरोग्यनामाऑनलाईन – बद्धकोष्ठता, अतिसार, वजन कमी होणे, भूक कमी होणे, पोटदुखी हे त्रास इरिटेबल बाउल सिंडड्ढोम म्हणजे आतड्यांसंबंधी आजारामुळे होऊ शकतात. या त्रासापासून आराम मिळण्यासाठी तीन आसने केल्यास फायदा होऊ शकतो. या आसनांमुळे नव्र्हस सिस्टिम आणि पचनक्रियेत सुधारणा होते. परंतु, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच अशा आजारात ही आसने करावीत. पवनमुक्तासन, अर्ध मत्स्येंद्रासन, सुप्त उदाराकर्षण ही तीन आसने आसने आतड्यांच्या आजारावर लाभदायक आहेत.पवनमुक्तासन करताना आधी जमिनीवर शवासनात झोपावे. नंतर दोन्ही पाय गुडघ्यापासून आत दुमडत पोटाशी घट्ट धरावेत. गुडघा छातीपर्यंत लावण्याचा प्रयत्न करावा आणि पोटावर हलकासा दबाव आणण्याचा प्रयत्न करावा. आता श्वास अलगद बाहेर सोडत पुन्हा सावकाशपणे हनुवटीने गुडघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा. आपला शक्तीनुसार कालावधी निश्चित करावा. पुन्हा हलकासा श्वास सोडत पुन्हा शवासनाच्या आधीच्या स्थितीत यावे. हे आसन ३ ते ४ वेळा करता येऊ शकते. बद्धकोष्ठता, आळस व लठ्ठपणा दूर करण्यास हे आसन सहायक आहे. उच्च रक्तदाब, स्लिप डिस्क आणि सायटिकाच्या रुग्णांनी हे आसन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय करू नये.
दुसरे आसन आहे अर्ध मत्स्येंद्रासन. हे आसन करताना खाली बसून दोन्ही पाय सरळ करा. डावा पाय गुडघ्यात वाकवून टाच पाश्र्वभागाच्या खाली न्या. उजवा पाय गुडघ्यात वाकवून उभा करा आणि डावा पाय मांड्यांपासून वर नेऊन मांड्यांच्या मागे जमिनीवर टेकवा. आता डावा पाय उजव्या गुडघ्याच्या पलीकडे नेऊन अर्थात गुडघ्याच्या बाजूलाच ठेवून डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा. या आसनामुळे बद्धकोष्ठता, पचनक्रिया सुधारण्यासह अनेक फायदे होतात.
सुप्त उदाराकर्षण हे तिसरे आसन असून हे करण्यासाठी आसनावर पाठीवर झोपा. हाताला खांद्याच्या रेषेत पसरवा किंवा डोक्यावर हात घ्या. आता दोन्ही पायांना दुमडून नितंबाजवळ ठेवा आणि दोन्ही गुडघ्यांना चिकटवून ठेवा. गुडघ्यांना उजव्या बाजूला वाकवून जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान गुडघे व पायांचे पंजे एकमेकांवर ठेवा. मानेला डाव्या बाजूने फिरवा. ५-६ सेकंद या स्थितीत राहा. असेच दुसऱ्या बाजूने करा. ८ ते १० वेळा करावे. यामुळे बद्धकोष्ठता, अतिसार, पोट आखडणे यामध्ये आराम मिळतो. तसेच शरीरात स्फूर्ती वाढते.
Skin Care Mistakes | 5 मोठ्या चूका, ज्यामुळे उडते चेहऱ्याची रंगत!
नवी दिल्ली : Skin Care Mistakes | लोक अनेकदा स्कीन रूटीन फॉलो करतात, पण काही छोट्या-छोट्या चुकांमुळे चेहऱ्यावर निस्तेजपणा दिसू...
Read more