आरोग्यनामा ऑनलाइन – लहान मुलांपासून अगदी मोठ्यापर्यंत सर्व दूध पितात. दूध हे पूर्णांन्न आहे. यामध्ये मोठ्याप्रमाणात शरीराला आवश्यक घटक आहेत. आपल्याकडे दूध पिण्यासह अन्य अनेक पदार्थांमध्येही वापरले जाते. परंतु, हेच दूध काही पदार्थांसोबत खाल्ल्याने नुकसान होऊ शकते. आयुर्वेदानुसार दुधासोबत काही पदार्थ एकत्र खाल्ल्याने इनडायजेशन, वजन वाढणे, स्किन डिसिज सारख्या त्रास होऊ शकतात. दूध कोणकोणत्या पदार्थांसोबत खाणे टाळावे, याबाबत आपण माहिती घेऊयात.
दूध आणि दह्याने तयार केलेले पदार्थ एकत्र खाऊ नये. हे एकत्र खाल्ल्याने अॅसिडिटी, गॅस, वोमेटिंग आणि इनडायजेशनची समस्या होऊ शकते. तसेच लिंबू किंवा आंबट पदार्थ खात असाल तर एक तासांपर्यंत दूध घेऊ नये. हे एकत्र खाल्ल्याने अॅसिडिटी, गॅसची समस्या होऊ शकते. दूध आणि आंबट फळे मिसळून बनवलेले शेक कधीच पिऊ नये. यामुळे वोमेटिंग, लूज मोशनची समस्या होऊ शकते. आंबट फळ खाल्ल्यानंतर २ तासांपर्यंत दूध पिऊ नये. दूधासोबत चिप्ससारखे चटपटीत पदार्थ खाणे टाळावे. मीठामुळे दूधातील प्रोटीनचा पुर्ण फायदा मिळत नाही. त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात.
सर्दी-पडसे, खोकला किंवा कफची समस्या असेल तर दूधसोबत केळी खाऊ नयेत. यामुळे कफ वाढतो. तसेच ज्या पदार्थांमध्ये कांदा आहे. त्यासोबत किंवा त्यानंतर दूध पिणे टाळावे. यामुळे खाज, एग्जिमा, सोरायसिस समस्या त्वचेच्या समस्या निर्माण करते. मिरची-मसाल्याच्या पदार्थांसोबत दूध किंवा दूधापासून तयार केलेले पदार्थ खाणे टाळावे. हे खाल्ल्याने पोटदुखी, अॅसिडिटी, गॅस आणि वोमेटिंगची समस्या होऊ शकतो. तसेच मासे हे गरम असतात. तर दूध हे गार असते. हे एकत्र घेतल्याने गॅस, अॅलर्जी आणि त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात. उडद डाळ आणि दूध दोन्हींही पचण्यास वेळ लागतो. हे एकत्र खाल्ल्याने इनडायजेशन आणि गॅसची समस्या होऊ शकते.