आरोग्यानामा ऑनलाइन टीम : सिगारेट ओढणे, तंबाखू खाणे हे शरीरासाठी अतिशय घातक आहे. या व्यसनांमुूळे शरीरात निकोटीनचे प्रमाण वाढत जाते. या निकोटीनमुळे आपला जीवदेखील जाऊ शकतो. शरीरातील निकोटीनचे प्रमाण कमी करण्यासाठी काही पदार्थ उपयुक्त असून त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत.
हे आहेत उपयुक्त पदार्थ
१ पालक
यातील फॉलिक अॅसिड व विटॅमिन बी-९ मुळे शरीरातून निकोटीन बाहेर पडते. मानसिक स्थिती उत्तम राहते.
२ आले
आले खाल्ल्याने निकोटीन खाण्याची इच्छा कमी होते. निकोटीनच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी होते.
३ लिंबू
यातील अॅसिड व विटॅमिन सी हे धुम्रपानाच्या वाईट परिणामांचे प्रमाण कमी करते. शरीर निरोगी बनवते.
३ गहू
यातील व्हीटजर्म ह्रदयरोगापासून दूर ठेवतात.
४ डाळिंब
यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. लालपेशींचे प्रमाण वाढते.
५ केळी
यातील अँटीऑक्सिडंटमुळे शरीरातील निकोटीन बाहेर काढले जाते.
६ ब्रोकोली
यातील विटॅमिन सी मुळे पचनक्रिया सुधारते. फुफ्फुसांचे विषारी पदार्थांपासून रक्षण होते. टॅमिन बी-५ मुळे निकोटीन फ्लश आऊट होते.
७ गाजर
धुम्रपानामुळे शरीरातील विटॅमिन ए व सी संपते. गाजर खाल्ल्याने शरारातील विटॅमिन ए, सी व के ची कमतरता भरून निघते.
८ संत्री
यातील विटॅमिन सी मुळे निकोटीन घेण्याची इच्छा मंदावते.
Visit : arogyanama.com