आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कामाच्या व्यापात तब्येतीकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. या दुर्लक्षामुळे भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आरोग्याकडे लक्ष न दिल्यानेच पोट वाढण्याची समस्या होते. वेगाने वाढणाऱ्या जाडीमुळे अनेकजण चिंताग्रस्त असतात. वाढलेले पोट कमी करण्यासाठी विविध प्रयोग केले जातात. परंतु , असे प्रयोग करण्यापूर्वी नेमक्या कुठल्या करणाने पोट वाढत आहे, हे जाणून घेणे महत्वाचे असते. पोट वाढण्याची नेमकी कारणे, आणि ते कमी करण्याचे उपाय यांची माहिती जाणून घेवूयात.
यामुळे कारणांमुळे वाढते पोट
* व्यायाम न करण्याने देखील जाडी वाढते. व्यायाम केल्याने शरीर तंदूरूस्त राहण्यास मदत होते.
* अति खाण्याने तसेच डायटिंगमुळे व्यवस्थित जेवण न करणे.
* जास्त ताण घेतल्याने मेद वाढू शकतो.
* टिव्ही, कॉम्प्यूटरसमोर जास्त वेळ बसणे.
* बाहेरचे जंक फूड खाणे.
ही काळजी घ्या
* फायबरयुक्त भोजन घ्यावे. हे घेतल्याने शरिरातील कोलेस्टेरॉल वाचण्यास मदत होते. तसेच फायबरयुक्त आहारामुळे शरिरातील जास्तीच्या कॅलरी बर्न होतात.
* तासंतास वर्कआउट करणे अथवा पळणे यापेक्षा थोडी अॅक्टिव एक्सरसाइज करावी. यामुळे शरिरातील फॅट कमी होते.
* दिवसातून एका व्यक्तीने ८ ते १० ग्लास पाणी प्यावे.
* साधारण ६ ते ८ तास झोप ही आवश्यक असते. कमी झोप घेतल्याने अथवा जास्त झोप घेतल्यानेही जाडी वाढू शकते.
* पोटाची जाडी कमी करण्यासाठी योग्य आहार घ्यावा. मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रीअंट्स असणारा संतुलित आहार घ्यावा. जास्त तेलकट पदार्थ आणि फास्ट फूड सेवन करू नये. घरचे अन्न खावे. काही अडचण असल्यास कच्ची फळे आणि वाफवलेल्या भाज्या खाव्यात.
* सकाळी नाश्ता करावा. यामुळे ब्लोटिंग वाढते आणि शरीराला जास्त भूक लागते.
* लसून, कांदा, आले , लाल मिरची, कोबी, टोमॅटो, दालचीनी हे फॅट कमी करणारे पदार्थ आहेत. सकाळी कच्चा लसून आणि एक इंच आल्याचा तुकडा खाणे. तसेच, कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध टाकलेले पाणी पिल्याने वजन कमी होते.