आरोग्यनामा ऑनलाईन टीम – घरात लहान बाळ जन्माला आले की, त्याची काळजी घेण्यासाठी सर्वजण झटत असतात. बाळाची औषधे, त्यास आंघोळ घालणे, मालिश करणे, आदी कामे नियमित केली जातात. यामध्ये महत्वाचे काम म्हणजे बाळाचे मालिश होय. अनुभवी व्यक्तीकडून बाळाची मालिश केली जाते. परंतु, बाळाची मालिश कोणत्या तेलाने करावी, असा प्रश्न नेहमी अनेक पालकांना पडतो. या प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत.
करा या तेलांचा वापर
1 तूप
तुपाने बाळाची मालिश केल्यास त्याच्या शरीराला ऊब मिळते. हिवाळ्यामध्ये बाळाला तुपाने मालिश करणे फायदेशीर असते.
2 खोबरेल तेल
खोबरेल तेलही बाळाच्या मालिशसाठी चांगले समजले जाते. यामुळे बाळाचा त्वचेच्या इन्फेक्शनपासून बचाव होतो. हे तेल कोमट करून वापरतात.
3 मोहरी तेल
मोहरीच्या तेलामुळे त्वचेचा इन्फेक्शनपासून बचाव होतो. हाडे मजबूत होतात.
4 बदाम तेल
यात अनेक पोषक तत्व असतात. बाळाच्या त्वचेवर तजेला येतो. त्वचा मुलायम होते. बाळाच्या शरीरातील हाडांनाही फायदा होतो.
5 ऑलिव्ह ऑइल
त्वचेचा रंग उजळतो. केसांची वाढ होते.