आरोग्यनामा ऑनलाईन टीम – तुम्ही जर मांसाहारी खाण्याचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी अतिशय धोक्याची सूचना आहे. कारण प्रमाणापेक्षा अधिक मांस खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो. विशेषतः बीफ खाणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका अधिक असतो. बीफऐवजी मासे, अंडी, खडं धान्य, आणि भाज्या खाणारे अधिक काळ जगतात. यासाठी सुमारे पन्नास हजार लोकांचा डेटा गोळा करण्यात आला होता. डेटाच्या निष्कर्षानुसार मासे, अंडी, धान्य आणि भाज्या खाल्ल्याने व्यक्ती अधिक काळ स्वस्थ राहू शकतो आणि बीफ खाल्ल्याने मृत्यूचा धोका नाकारता येत नाही. जाणून घ्या बीफ खाण्याचे आरोग्यावर होणारे परिणाम.
अधिक मांसाहार करण्याचे तोटे-
मांसाहार करणा-या व्यक्तीचा स्वभाव तसाच उग्र होण्याची शक्यता जास्त असते. जास्त मांसाहार केल्याने लक्ष केंद्रीत करण्यात अडचणी येतात. त्यामुळे रागावर नियंत्रण राहात नाही. राग पटकन येतो.
मांसाहार केल्याने बीपी वाढतो.
वजन वाढण्यास मदत होते. कोलोस्ट्राल वाढीसाठी ते एक मोठे कारण आहे.
मांसाहारामुळे वजन व कोलेस्ट्रॉल वाढते.