आरोग्यानामा ऑनलाईन टीम – snoring | एखाद्याच्या घोरण्याच्या सवयीमुळे त्याच्यासोबत झोपणारे लोक जास्त त्रस्त असतात. त्यामुळे घोरण्याचा त्रास हा अन्य लोकांना जास्त होतो. परंतु, जीभेच्या व तोंडाच्या व्यायामाने यावर मात करता येते. या व्यायामामुळे घोरण्याचे (snoring) प्रमाण ३६ टक्के कमी होते तर ५९ टक्के घोरण्याचा आवाज कमी होतो.
हे आहेत उपाय
1. घोरण्याची सवय असलेल्या व्यक्तीने, टाळूच्या विरुद्ध दिशेला जीभेचे टोक मागे वळवण्याचा प्रयत्न करावा.
2. जीभ टाळूवर घासून खालच्या बाजूला आणण्याचा प्रयत्न करा.
3. जीभेच्या पुढच्या टोकाला टाळूच्या दिशेनं दाबावे. त्यानंतर जीभेला पुन्हा खेचून घ्यावे. आता जीभेच्या पुढच्या बाजूने दातांना स्पर्श करत जीभेच्या मागील भागास टाळूच्या दिशेला दाबावे आणि ए उच्चार करावा.
4. एक कप कोमट पाण्यात एक चमचा हळद आणि एक चमचा मध मिसळून प्या. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण प्यावे.
5. रोज झोपण्याआधी कोमट पाण्यात वेलची पावडर मिसळून प्या. यानेही घोरण्याची समस्या कमी होते.
6. रोज झोपण्याच्या अर्धातासआधी हळद घातलेले दूघ प्या.
7. झोपण्यापूर्वी पाण्यात पुदीन्याच्या तेलाचे काही थेंब टाकून गुळणी करा.
8. सरळ पाठीवर झोपण्याऐवजी कुशीवर झोपा.
9. वजन कमी करा
10. रात्री झोपण्यापूर्वी मधासोबत ऑलिव्ह ऑईल घेतल्याने फायदा होतो.
11. उशीचे कव्हर नियमित बदला आणि स्वच्छ कव्हरचा वापर करा.
Visit : arogyanama.com