आरोग्यानामा ऑनलाईन टीम : आरोग्य चांगले राहण्यासाठी 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. झोप पूर्ण आणि शांत मिळाली तरच आरोग्य चांगले राहू शकते. अन्यथा विविध आजार होण्याचा धोका असतो. मात्र, जास्त झोप घेणेसुद्धा आरोग्यसाठी चांगले नाही. जास्त झोपेचे सुद्धा अनेक दुष्परिणाम आहेत. 8 तासांपेक्षा जास्त झोप घेतल्याने कोणते नुकसान होते ते जर्नल ऑफ अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोटच्या आधारे जाणून घेवूयात.
1 जे लोक आठ तासांपेक्षा जास्त झोप घेतात त्यांचा लवकर आणि वेळेच्याआधी मृत्यू होण्याची शक्यता अधिक वाढते.
2 आठ तासांपेक्षा जास्त झोप घेणार्या लोकांमध्ये हृदयासंबंधी आजार आणि स्ट्रोक होण्याचा धोका अधिक असतो.
3 जे लोक अधिक झोपतात, ते शारीरिक रुपाने कमी अॅक्टीव्ह असतात. अशात त्यांना हृदयाशी निगडीत वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता अधिक असते.
4 जे लोक रात्री 9 तास झोपतात, त्यांच्या मृत्यू दरात 14 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर 10 तास झोपणार्यांंचा मृत्यू दर 30 टक्के आणि 11 झोपणार्यांचा मृत्यूदर 47 टक्के आढळून आला आहे.
Visit : arogyanama.com