आरोग्यानामा ऑनलाईन टीम : लठ्ठपणा ही सध्या मोठी आरोग्य समस्या असून ती जगभरात भेडसावते आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध प्रयत्न करत असतात. कारण, वजन वाढले की अनेक आजार शरीरात घुसखोरी करतात. वजन वाढण्याची विविध कारणे आहेत. योग्य आहार, व्यायाम आणि चुकीच्या सवयी सोडल्यास वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. वजन वाढल्याने कोणत्या शारीरीक समस्या होऊ शकतात, याची माहिती आपण घेणार आहोत.
हे आहेत लठ्ठपणाचे परिणाम
१ कोलेस्ट्रॉल
शरीरातील अतिरीक्त फॅटमुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोक सारख्या गंभीर समस्यांचा धोका निर्माण होतो.
२ त्वचा रोग
लठ्ठपणामुळे हार्सोन्सचे संतुलन बिघडून त्वचा प्रभावित होते. यामुळे त्वचेवर काळे डाग तयार होतात. तसेच अन्य त्वचारोग होऊ शकतात.
३ स्लीप एपनिया
लठ्ठपणामुळे छाती, मान आणि चेहऱ्यावरील जास्तीच्या मांसामुळे श्वासनलिका दबली जाते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. शरीरात योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहचत नाही.
४ मधुमेह
मध्यम जाडेपणामुळेसुद्धा टाईप २ चा मधुमेह होण्याचा धोका असतो.
५ तणाव
लठ्ठपणा मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामुळे तणाव आणि डिप्रेशनचा त्रास होऊ शकतो.
Visit : arogyanama.com