Sesame Oil Benefits | तिळाच्या तेलामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, जाणून घ्या त्याचे इतर फायदे
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Sesame Oil Benefits | तिळाचं तेल (Sesame Oil) मानवी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे का? या तेलाचे सेवन केल्याने आतड्यांसंबंधी कोलेस्ट्रॉल कमी होते. याच्या वापरामुळे अॅनिमियाची समस्या दूर होण्यास मदत होते (Health Tips), याशिवाय वजन वाढण्यासही हे तेल उपयुक्त ठरते (Sesame Oil Benefits). तर आज आपण जाणून घेऊया तिळाच्या तेलाचे फायदे! (Know The Benefits Of Sesame Oil)
फायबरचे प्रमाण भरपूर असते (Contains Good Amount Of Fiber) :
वजन वाढणं (Weight Gain) –
तिळात फायबरचं प्रमाण चांगलं असतं. ज्या लोकांना स्थूल व्हायच असेल त्यांनी तीळाचे सेवन करावे, त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते (Sesame Oil Helps In Increasing Immunity Know Its Benefits). तीळात पुरेशा प्रमाणात कॅलरी आणि कर्बोदके असतात, ज्यामुळे शरीराचे वजन वाढते.
अॅनिमिया दूर करते (Eliminates Anemia) –
तिळामध्ये व्हिटॅमिन ए आणि लोह (Vitamin A And Iron) मोठ्या प्रमाणात असते. या दोन खनिजांमुळे शरीराचं रक्त वाढतं. यामुळे अॅनिमियाचा धोका उद्भवत नाही. तीळाचे सेवन रोज थोडे करावे. अॅनिमियाग्रस्त व्यक्तींनी दररोज योग्य प्रमाणात तिळाचे सेवन करावे.
रोगप्रतिकारशक्तीत वाढ (Increased Immunity) –
तिळाच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्तीही वाढते. तिळात फायटोस्टेरॉलचे प्रमाण सर्वाधिक असते. अभ्यासानुसार असे आढळले आहे की, फायटोस्टेरॉल आतड्यांसंबंधी कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करण्यास मदत करतात.
कर्करोगापासून बचाव (Cancer Prevention) –
तीळात अशी काही संयुगे असतात. ज्यामुळे कर्करोगापासून बचाव होण्यास मदत होते.
तीळात अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जी कर्करोगाच्या पेशींना निष्प्रभ करण्यास मदत करतात.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- sesame oil helps in increasing immunity know its benefits
Onion Oil Benefits | कांद्याच्या तेलाचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, घ्या जाणून
Health Tips | वयाच्या 60 व्या वर्षानंतरही योगाभ्यास करता येतो का? जाणून घ्या कोणती आसनं फायदेशीर