आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्या श्रावण महिना सुरु आहे आणि हिंदू धर्मामध्ये श्रावण महिण्याला खूप महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे अनेकजण या महिन्यात उपवास करत असतात. उपवास केलेला काही अंशी चांगला असतो. पण काही गर्भवती महिला पण श्रावण महिन्यात उपवास करतात. गर्भवती महिलांना वेळेवर जेवण करणे खूप गरजेचे असते आणि या दिवसात त्यांना स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे त्यांनी जर या महिन्यात उपवास केला तर त्यांनी आपली कशी काळजी घ्यावी हे आपण जाणून घेणार आहोत.
१) गर्भवती महिलांनी निरंकार उपवास कधीच करू नये कारण त्या जे खातात त्यामुळे त्याच्या पोटातील बाळाला पोषण मिळत असते. त्यामुळे गर्भवती महिलांनी निरंकार उपवास करू नये. करायचा असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
२) गर्भवती महिलांनी जर उपवास केला तर त्यांनी जास्त वेळ उपाशी राहू नये. उपवास केला तरी उपवासाचे पदार्थ खावेत. तसेच फळे आणि फळांचा ज्यूस घ्यावा. यामुळे त्यांचा उपवासही होईल आणि त्यांच्या बाळाचे योग्य असे पोषणही होईल.
३) उपवास असला की भूक लागू नये म्हणून अनेकजण चहा घेतात. पण गर्भवती महिलांनी जास्त चहा घेऊ नये. यांच्याऐवजी दही किंवा ताक खावे.
४) उपवास करत असताना आपल्या शरीराला चांगलं पोषण मिळावं म्हणून गर्भवती महिलांनी उपवास केल्यानंतर सुका मेवा खावा.