आरोग्यनामा ऑनलाईन- आपल्या देशात दृष्टीहीन(oranges ) लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. डोळ्यांचा प्रकाश कायम राखण्यासाठी आवश्यक फळ(oranges) आणि भाज्या याबद्दल येथे जाणून घ्या …
ज्यांचे डोळे पूर्णपणे अशक्त झाले आहेत आणि त्यांना पाहण्यात अडचण आहे, अशा दृष्टीहीन लोकांची संख्या भारतात गेल्या 30 वर्षांत दुप्पट झाली आहे. दोन वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या वृत्तांत हे उघड झाले आहे.
अहवालात स्पष्टपणे सांगितले आहे की ,जगातील बहुतेक अंध लोक सध्या भारतात आहेत. म्हणजेच मधुमेहानंतर आपला देशही अंधत्वाचा अड्डा बनला आहे. डोळे कमकुवत होणार नाहीत आणि ते तेजस्वी ठेवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टीचा समावेश केला पाहिजे, हे लक्षात घेतले पाहिजे.
निरोगी राहण्याचा मार्ग
पाहण्याची क्षमता राखण्यासाठी डोळयातील पडदा निरोगी हवा. त्यासाठी ल्युटीन आणि झेंथाइन कॅरोटीनोईड आवश्यक आहेत. हे दोन्ही पडद्याच्या मॅकुलाकडे प्रवास करतात आणि डोळ्यांची पाहण्याची क्षमता राखण्यास मदत करतात.
डोळे आतून निरोगी होण्यासाठी ल्युटीन आणि झेंथाइन कॅरोटीनोईड कार्य करतात. ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन कॅरोटीनोईड्स मिळणाऱ्या फळे आणि भाज्याचा वापर करणाऱ्यांना उतार वयात मोतीबिंदूचा त्रास होत नाही.
ल्युटीन आणि झेंथाइन कॅरोटीनोईड्स ऑक्सिजनचे मुक्त रॅडिकल्स शमविण्यास आणि निळे प्रकाश फिल्टर करण्यासाठी कार्य करतात. तसेच सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.
ल्युटीन आणि झेंथाइन कॅरोटीनोइड या फळांमध्ये
ल्यूटिन आणि जेक्सॅन्थिन दोन भिन्न कॅरोटीनोइड आहेत. काही फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये फक्त ल्युटीन किंवा फक्त झेंथाइन असतात. संत्री, पीच आणि हिरवी आणि लाल द्राक्षे यामध्ये दोन्ही कॅरोटीनोइड्स मिळतात.
ल्यूटिन समृद्ध फळ
कीवी, आंबा आणि संत्री फळांपासून ल्यूटिन मिळू शकते. ल्युटीन पिवळ्या भोपळ्यामध्ये आढळतो.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.