नखे कुरतडण्याच्या सवयीमुळे होऊ शकतात ‘हे’ विविध आजार

Nail-biting

आरोग्यनामा ऑनलाइन – दातांनी नखे कुरतडण्याची सवय अतिशय वाईट आहे. काही लहानांसह मोठ्यांमध्येही ही सवय दिसून येते. दीर्घकाळ ही सवय राहिल्यास अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. नखे कुरतडण्याच्या सवयीमुळे होणारे दुष्परिणाम कोणते याविषयी आपण जणून घेवूयात. नखे स्वच्छ न ठेवल्याने साल्मोनेला आणि ई कोलाईसारखे बॅक्टेरिया जमा होतात. अशावेळी नखे दाताने कुरतडताना ते शरीरात गेल्यास बॅक्टेरियल संसर्ग होतो.

नखे चावल्याने पॅरोनिशिया नामक त्वचेचा संसर्ग होऊ शकतो. यामध्ये नखाच्या आजूबाजूच्या स्किनमध्ये बॅक्टेरिया जातात. ज्यामुळे बोटांवर लालसरपणा आणि सूज येते. रोज नखे खाल्ल्यास बॉडीमध्ये ह्युमन पेपिलोमा व्हायरस पसरण्याचा धोका असतो. यामुळे हात, ओठ किंवा तोंडात मस होऊ शकतात. नखे चावल्याने यामधील घाण दातांवर जमा होते. यामुळे दात कमजोर होतात त्यांचा नैसर्गिक आकार बिघडतो. नखे चावल्याने नखांचे बॅक्टेरिया पोटापर्यंत पोहोचतात. यामुळे पोटात संसर्गाचा धोका वाढतो. तसेच नखांखालील मॅटिड्ढक्स नामक थर डॅमेज होतो. यामुळे नखांचा शेप बिघडतो.

अनेकांच्या हाताच्या १० बोटांच्या नखांपैकी ७-८ बोटांवरील अर्धचंद्राचा रंग दुधी पांढरा असेल तर आरोग्य चांगले असते. अशा वेळी शरीर निरोगी राहते. नखांवरील अर्धचंद्राचा रंग लाल असेल तर न्यूटिड्ढशनची कमतरता असू शकते. तसेच हे डायबिटीस, हार्ट डिसीज किंवा अ‍ॅनिमियाचा संकेत असू शकतो. बोटांवरील अर्धचंद्र जर लहान असेल तर हा इम्युन सिस्टिम कमजोर असल्याचा संकेत असतो. अशा वेळी अपचनाची समस्या होते. दोन्ही हातांच्या फक्त अंगठ्यांवरच अर्धचंद्र असेल तर हा किडनीच्या आजाराचा संकेत असतो.