आरोग्यानामा ऑनलाईन टीम : पाठीचे दुखणे होण्याची कारणे अनेक आहेत. ही समस्या ज्यांना होते त्यांना उठणे आणि बसणे अवघड होऊन जाते. कोणतेही काम करताना अनेक अडचणी येतात. यात कमरेच्या खालच्या भागात प्रचंड वेदना होतात आणि सूजही येते. काही वेळेस पाठीसोबतच पायाच्या टाचा आणि स्नायूंनाही वेदना होतात. पाठदुखीच्या दुखण्यावर खास घरगुती उपाय असून ते जाणून घेवूयात.
हे आहेत उपाय
1 दूध
नियमित दूध घेतल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होतात. शरीरातील कॅल्शिअमच्या कमतरतेमुळेही कंबरदुखीचा त्रास होतो.
2 योगा
नियमित सकाळी आणि संध्याकाळी योगा केल्याने बॅकपेनचा त्रास दूर होतो.
3 आले
अर्धा चमचा काळी मिरीची पूड, दिड चमचा लवंग पूड आणि एक चमचा आल्याची पूड एकत्र करून त्याचा हर्बल टी बनवून प्या.
4 तुळस
एक कप पाण्यामध्ये 8-10 तुळशीची पाने टाकून उकळून घ्या. ते पाणी थंड झाल्यानंतर त्यामध्ये एक चिमुटभर मीठ टाका. हे मिश्रण रोज थोडे थोडे प्या. त्यामुळे पाठीदुखी आणि कंबरदुखीवर आराम मिळेल.
5 बर्फाचा शेक
कंबर दुखीचा त्रास सतावत असेल तेव्हा त्याठिकाणी बर्फाने शेक द्या.
Visit : arogyanama.com