आरोग्यानामा ऑनलाईन टीम : अपचन, गॅस, पोटदुखी आदी समस्या या पचनक्रियेशी संबधीत आहेत. पचनक्रिया बिघडली की या समस्या होतात. याची विविध कारणे असून ती आहाराशी संबंधीत आहेत. पचनक्रिया बिघडली की शरीरावर वेगवेगळे दुष्परिणाम ताबडतोब दिसून येतात. यासाठी पचनक्रिया सुरळीत राहणे खुप महत्वाचे आहे. बिघडलेली पचनक्रिया ठिक करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
हे उपाय करा
1 कोमट पाण्यामध्ये कच्ची हळद मिसून प्या. गॅसेसचा त्रास कमी होतो.
2 जेवणानंतर अननस किंवा अननसाच्या रसाचे सेवन करा.
3 नारळाच्या तेलामुळे पचनक्रिया सुधारते. अपचन, बद्धकोष्ठता, अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.
4 पुदिन्याचा रस किंवा पाने चावून खाल्ल्यास पोटातील गॅस, पोटदुखी, पोटाला आतील बाजूने सूज कमी होते.
5 पपईचे सेवन केल्यास 24 तासांच्या आत पचनक्रिया सुधारते.
6 एक वाटी दही खावे. यामुळे पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
7 केळ्याचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते.
Visit : arogyanama.com