आरोग्यनामा ऑनलाइन टीम – घर, ऑफिस, स्कूल, कॉलेज, जिम आदी ठिकाणी अनेकजण पाण्याची बॉटल वापरातात. पिण्याचे पाणी या बॉटलमध्ये ठेवले जात असल्याने तिची स्वच्छता राखणे खुप महत्वाचे ठरते. बॉटल प्लॅस्टिक, स्टेनलेस स्टील अथवा काचेची असो तिची स्वच्छता ठेवली पाहिजे. अन्यथा महागात पडू शकते.
हे लक्षात ठेवा
१. प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये नेहमी मॉइश्चर असतात, ज्यामुळे त्यात बॅक्टेरिया राहतो. डायरिया होण्याची शक्यता अधिक असते.
२. पाण्याच्या बॉटल जास्तवेळ बंद असल्याने दमटपणा निर्माण होतो आणि याच कारणामुळे त्यात बॅक्टेरिया निर्माण होतात.
३. बॉटल आतपर्यंत स्वच्छ करण्यासाठी ब्रशचा वापर करा. अन्यथा त्यात व्हिटॅमिन इ बॅक्टेरिया वाढतो. यामुळे फूड पॉयजनिंगची समस्याही होऊ शकते.
४. बॉटल गरम पाण्याने ब्रशने स्वच्छ करावी.
५. बॉटलमध्ये विनेगर टाकूनही तुम्ही बॉटल स्वच्छ करु शकता.