आरोग्यानामा ऑनलाईन टीम : कधीकधी टेन्शन सतावते, अस्वथता आणि नकारात्मक विचार मनात येतात. अशा स्थितीला दूर सारून रिफ्रेश होण्यासाठी काही सोपे उपाय असून त्यापैकी खास उपाय म्हणजे डोक्याचा आणि शरीराचा मसाज करा. घरच्या घरी सुद्धा हा उपाय करता येईल. यामुळे खरोखरच रिलॅक्स वाटून मूड ठिक होतो.
हे आहेत फायदे
१ एक अनामिक शांती लाभते.
२ टेन्शन कमी होते.
३ रिलॅक्स वाटते.
४ नवी ऊर्जा प्राप्त, उमेद मिळेल.
५ महिलांना मेनिक्युअर, पेडिक्युअरने बरे वाटेल.
हे सुद्धा करू शकता
* काही करता आले नाही तर डोळे मिटून शांतपणे थोडावेळ पडून राहा. सगळ्या विचारांना आपल्या मनातून घालवायचा प्रयत्न करा. विचार असे सहजासहजी जात नाहीत, पण तरीही तुम्ही नक्कीच फ्रेश व्हाल.
* निराशाजनक, त्रासदायक विचारांना येऊ द्या. त्यांना अडवू नका. त्यांच्यासाठी वाट मोकळी करून द्या. अगदी तुम्हाला रडू आलं तरी मनसोक्त रडून घ्या.
* भावनांना मुक्त वाट करून द्या.
* जवळच्या व्यक्तीशी त्या विषयावर बोला. मनात साचलेले मोकळे करा.
* नकारात्मक भावना यामुळे दूर होतील.
Visit : arogyanama.com